Friday, December 16, 2011

एक आठवण


हे तुझं अस वागन मला पटत नाही,
भविष्यच हवं तुला, वर्तमान पुरत नाही...

प्रेत्येक वेळी जेव्हा तू अस बोलतेस,
एक आठवण नक्कीच कमी करतेस...

मला एवढंच माहित आहे

मला एवढंच माहित आहे ,
मला तुझी आठवण येते .....
सतत...सारखी.. येणारी आठवन
तुझ्यामाझ्या मनाला बांधू पहाते....
पण तू नेहमीच या बंदानाला वेगळ वळण देतेस,
कस मी सांगू कितीही चिडलो तरी मनात तू नक्कीच असतेस....

पण तरीही काळ आणि वेळ हे गणित लक्षात असू दे...
बाकी सगळ ठेव, पण गैरसमज मनात नसू दे...

Sunday, November 20, 2011

तुझी आठवण...

आठवण येते कधी मला
अन गालावर खुदकन खळी पड़ते...
तर कधी हसता हसता
डोळी माझ्या पाणी आटते...


खर सांगू तर त्याच्या आठवणी मला एकट राहूच देत नाहीत...

काय करणार त्या सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाहीत...

या विश्वात असतांना देखील नव विश्व त्या दाखवतात...
कधी सार स्पष्ट तर कधी सार काही दिसेनासं बनवतात...


दूर लोटण्याचा प्रयत्न करण कधीच सोडलंय मी...
कारण एक भावनिक नात यांच्याशी जोडलंय मी...

हीच आहे माझी खरी मैत्रिण
नेहमी साथ देणारी....
आगंतुक असली तरी
हवी हवीशी वाटणारी......

Wednesday, October 12, 2011

तुला काही काम नाही का???

तुला काही काम नाही का???

जेव्हा नाही तेव्हा मिसळ पाव मागतेस...

आधीच हत्तीच पिल्लू आहेस अजून किती खातेस???

तुला काही काम नाही का???

मजा म्हणून रात्र रात्र जगतेस...

अन् खुशाल दिवसभर अंथरुणात लोळ्तेस...

तुला काही काम नाही का???

भांडे घासायच्या नावाखाली रोज समान तोडतेस...

आजची काम १० लिहून त्यातली ९ रोज खोड्तेस...

तुला काही काम नाही का???

मनात माझ्या घुसखोरी करायचं...

आत तर यायचं पण जाण्याचं नाव नाही काढायचं...

स्वप्नात अन् आठवणीतही तू अन् तूच फिरायचं...

तरीही प्रेमच नाव काढताच गप्प गुमान बसायचं???

तुला काही काम नाही का???

विचारतोय कारण मला सांभाळायच काम तुला द्यायचय...

तुझ्यातच मला आयुष्यभर गुंतून रहायचय...

हा समान तोडण मात्र सोडव लागेल...

तुला काही काम नाही का??? विचारल्यावर,

“तुझ्यावर प्रेम करन” हे आयुष्यभर सांगाव लागेल...

Saturday, June 25, 2011


मोगरा पुन्हा दरवळू लागला...

वाटलं होत संपल सार, सुटल सार आता नाही जगायचं,

कोणीच नाही माझ्यासाठी तर मी का नाही मरायचं...


पण

एक दव असावा गवतावर अशी ती आली,

पावसानंतरच्या सुर्याकिरनासम ती दिसू लागली...

पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे तिचं बोलन मनात माझ्या शिरलं,

या वाळवंटी आयुष्यात माझ्या आता ती सोडून काहीच नाही उरलं...

चंद्रही आज कल भेटायला मला येऊ लागला,

कस काय कुणास ठाऊक?

पण,

मोगरा पुन्हा दरवळू लागला...

Sunday, June 19, 2011

पण तु त्याला भातुकलीचा खेळ समजलीस



आजही आठवतंय तु यायची,

सोबतीला एक गंध स्वतःचा घेऊन,

जायची माझ्या साऱ्या अस्तित्वाला

प्रीतीचा रंग देऊन...

म्हटलं होती आपण

आपल्या भविष्याची गाणी,

आठवतंय आजही

कारण तू तर माझ्या सर्वस्वाची राणी...

क्षणात दिवस घालवायचो आपण,

सुर्यालाही चंद्र दाखवायचो आपण...

ते न संपणारे वाद,

ते न थांबणारे संवाद...

सगळ्यात पुढ ठेवल होत तुला,

तूच तर एक होतीस ओळखल जीने मला...

जन्माभराच्या शपता घेतल्या होत्या बरोबर,

जन्मानंतरच्या गोष्टीही केल्या होत्या बरोबर...

आपलंच एक विश्व तयार केल होत आपण.... नाही मी

काहीही झाल तरी बदलायचं नाही अस ठरवलं होत आपण... नाही तू

मग काय झाल अचानक,....

अस काय घडल की तू अचानक इतकी बदललीस???

माझ जीवन सत्य आहे हे,

पण तू त्याला भातुकलीचा खेळ समजलीस...

अग भातुल्कीचा खेळही कुणी अस तोडणार नाही,

तू जस् केल तस तर खुद्द नियतीही कुणाबरोबर करणार नाही....



Monday, June 13, 2011

नात कधीच नाही संपल


नात कधीच नाही संपल

झाल गेल सरल सार,

संपला तो सहवास, राहिले फक्त अवशेष....

आता काय करणार?

फक्त नातच राहिलंय शेष....


कधी केव्हा कुठे कसा
समजलाच नाही,संपला आपला प्रवास,

राहिलंय तो फक्त,

एक शेवटचा निश्वास


कळलंच नाही कधी,
पण खुप जीवं लागला होता
तू तर निघून गेलीस,

फक्त या नात्याचाच धागा उरला होता...



वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास?
निसटून गेली हातून प्रेमाची रेती,
उरला आहे तो या नात्यावर विश्वास...

क्षण भराच प्रेम आपलं
नात कधीच नाही संपल

म्हणूनच अजूनही वाट तुझी पाहत आहे,

ह्या नात्यामुलेच आजपर्यंत जिवंत आहे...

Saturday, June 11, 2011

अशीच एक आठवण एका पावसाची....

सगळ्याच आठवणी एकाच नजरेतून पहायच्या नसतात,

मग त्यात त्याचं नावपण ते उरातच नाही...

आणि साऱ्याच आठवणी मनातून निघत नसतात,

जर त्या निघाल्याच तर जगायला अर्थच उरत नाही...

अशीच एक आठवण एका पावसाची....

आज उगाच आठवला तो पाऊस, जो हृदयात खोलवर लपला होता,

जेव्हा पावसात न भिजण्याचा माझा निर्धार संपला होता...

पण एक प्रकारे बरच झाल...

त्या पावसातला सुगंध आजही मनात दरवळतोय,

कस ते ठाऊक नाही पण आजही तो माझ्यावर बरसतोय...

तो दिवस अन पाऊस माझ्या श्वासा-श्वासात मिसळलाय,

आज उगाचच तो पाऊस मला आठवलाय...

Friday, June 10, 2011

तुझी आठवण.

सांगू कसा कि तुला विसरण माझ्याकडून होणार नाही,
पण काय करू तुझ्या लायकीचा होईपर्यंत मी समोर येणार नाही...
सारी वाचणे आजही पळतोय मी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात,
जपलय तुझ्या आठवणींना पुस्तकातील पानाच्या रुपात...

आजही मी तोच डाव तिथच ठेऊन, त्याच दुनियेत राहतोय,
तू येशील... डाव पूर्ण करशील, याचीच वाट पाहतोय...

Thursday, June 9, 2011

आला हा पाऊस...

आठवणींचा पाउस सारखाच बरसतोय...
रिमझिम सरीना तुझा निरोप घेवून पाठवतोय...
का त्या जीवघेणा खेळ खेळतायत,
तुझ्यामाझ्यातल प्रेम आणखीन वाढवतायत...

हा पाऊस काहीसा तुझ्यासम जाणवतोय,
कधी जवळून तर कधी दुरून मला जळवतोय...
ठाऊक आहे त्याला तू नाही तर मी एकटा भिजणार नाही,
तरीही बरसून उगाचच मला चिडवतोय...