सगळ्याच आठवणी एकाच नजरेतून पहायच्या नसतात, मग त्यात त्याचं नावपण ते उरातच नाही...
आणि साऱ्याच आठवणी मनातून निघत नसतात,
जर त्या निघाल्याच तर जगायला अर्थच उरत नाही...
अशीच एक आठवण एका पावसाची....
आज उगाच आठवला तो पाऊस, जो हृदयात खोलवर लपला होता,
जेव्हा पावसात न भिजण्याचा माझा निर्धार संपला होता...
पण एक प्रकारे बरच झाल...
त्या पावसातला सुगंध आजही मनात दरवळतोय,
कस ते ठाऊक नाही पण आजही तो माझ्यावर बरसतोय...
तो दिवस अन पाऊस माझ्या श्वासा-श्वासात मिसळलाय,
आज उगाचच तो पाऊस मला आठवलाय...
No comments:
Post a Comment