
आजही आठवतंय तु यायची,
सोबतीला एक गंध स्वतःचा घेऊन,
जायची माझ्या साऱ्या अस्तित्वाला
प्रीतीचा रंग देऊन...
म्हटलं होती आपण
आपल्या भविष्याची गाणी,
आठवतंय आजही
कारण तू तर माझ्या सर्वस्वाची राणी...
क्षणात दिवस घालवायचो आपण,
सुर्यालाही चंद्र दाखवायचो आपण...
ते न संपणारे वाद,
ते न थांबणारे संवाद...
सगळ्यात पुढ ठेवल होत तुला,
तूच तर एक होतीस ओळखल जीने मला...
जन्माभराच्या शपता घेतल्या होत्या बरोबर,
जन्मानंतरच्या गोष्टीही केल्या होत्या बरोबर...
आपलंच एक विश्व तयार केल होत आपण.... नाही मी
काहीही झाल तरी बदलायचं नाही अस ठरवलं होत आपण... नाही तू
मग काय झाल अचानक,....
अस काय घडल की तू अचानक इतकी बदललीस???
माझ जीवन सत्य आहे हे,
पण तू त्याला भातुकलीचा खेळ समजलीस...
अग भातुल्कीचा खेळही कुणी अस तोडणार नाही,
तू जस् केल तस तर खुद्द नियतीही कुणाबरोबर करणार नाही....
No comments:
Post a Comment