
मोगरा पुन्हा दरवळू लागला...
वाटलं होत संपल सार, सुटल सार आता नाही जगायचं,
कोणीच नाही माझ्यासाठी तर मी का नाही मरायचं...
पण
एक दव असावा गवतावर अशी ती आली,
पावसानंतरच्या सुर्याकिरनासम ती दिसू लागली...
पावसाच्या पहिल्या थेंबाप्रमाणे तिचं बोलन मनात माझ्या शिरलं,
या वाळवंटी आयुष्यात माझ्या आता ती सोडून काहीच नाही उरलं...
चंद्रही आज कल भेटायला मला येऊ लागला,
कस काय कुणास ठाऊक?
पण,
मोगरा पुन्हा दरवळू लागला...


