
नात कधीच नाही संपल
झाल गेल सरल सार,
संपला तो सहवास, राहिले फक्त अवशेष....
आता काय करणार?
फक्त नातच राहिलंय शेष....
कधी केव्हा कुठे कसा
समजलाच नाही,संपला आपला प्रवास,
राहिलंय तो फक्त,
एक शेवटचा निश्वास
कळलंच नाही कधी,
पण खुप जीवं लागला होता
तू तर निघून गेलीस,
फक्त या नात्याचाच धागा उरला होता...
वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास?
निसटून गेली हातून प्रेमाची रेती,
उरला आहे तो या नात्यावर विश्वास...
क्षण भराच प्रेम आपलं
नात कधीच नाही संपल
म्हणूनच अजूनही वाट तुझी पाहत आहे,
ह्या नात्यामुलेच आजपर्यंत जिवंत आहे...
No comments:
Post a Comment