Sunday, April 22, 2012

सगळ सोप्पं होत


सगळ सोप्पं होत जेव्हा कारण असतं जगायसाठी...
हृदयात दुःख ही लपत, जर कुणी असेल हृदयात रहायसाठी...

रडल्यावर सावरून हसण शक्य आहे,
जर कुणीतरी आहे तिथं, आपल्याला हसवायसाठी...

दूरवर चालेल्या वाटेवरून परत येन शक्य आहे,
जर कुणी आहे पलीकडे वाट पहायसाठी....

बोलायासाठी जितक सोप्पं तितकंच वागायसाठीही सोप्पं,
जर कारण असेल जगायसाठी... जर कारण असेल जगायसाठी...



Monday, January 2, 2012

tich jan...


शेवटची निघून जाताना, ओल्या डोळ्याने हसली होती ती,
तसेच मोती शोधायसाठी; आजही दवाची वाट पाहतोय मी...

तू गेलेल्या रस्त्यावर, गवतातून लपतछपत पळणारी,
नजर माझी फिरती, तुझ्या पाऊलखुणा शोधणारी...

सांग कसं मी सोडू तुझी वाट पाहणं???
पडणाऱ्या प्रत्येक थेंबात तुझा चेहरा पाहत राहणं???