तुला काही काम नाही का???
जेव्हा नाही तेव्हा मिसळ पाव मागतेस...
आधीच हत्तीच पिल्लू आहेस अजून किती खातेस???
तुला काही काम नाही का???
मजा म्हणून रात्र रात्र जगतेस...
अन् खुशाल दिवसभर अंथरुणात लोळ्तेस...
तुला काही काम नाही का???
भांडे घासायच्या नावाखाली रोज समान तोडतेस...
आजची काम १० लिहून त्यातली ९ रोज खोड्तेस...
तुला काही काम नाही का???
मनात माझ्या घुसखोरी करायचं...
आत तर यायचं पण जाण्याचं नाव नाही काढायचं...
स्वप्नात अन् आठवणीतही तू अन् तूच फिरायचं...
तरीही प्रेमच नाव काढताच गप्प गुमान बसायचं???
तुला काही काम नाही का???
विचारतोय कारण मला सांभाळायच काम तुला द्यायचय...
तुझ्यातच मला आयुष्यभर गुंतून रहायचय...
हा समान तोडण मात्र सोडव लागेल...
तुला काही काम नाही का??? विचारल्यावर,
“तुझ्यावर प्रेम करन” हे आयुष्यभर सांगाव लागेल...
No comments:
Post a Comment